अमरावतीत भूगर्भशास्त्र विभागाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद, १९ व २० डिसेंबर रोजी आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 07:26 PM2017-12-13T19:26:57+5:302017-12-13T19:27:10+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या वतीने बेसिन डायनॅमिक्स, फेसिस आर्किटेक्चर अँड पॅलिओक्लायमेट आणि ३४ वी इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्स या विषयावर १९ व २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

The two-day National Council of Geological Dept of Amravati, organized on 19th and 20th of December | अमरावतीत भूगर्भशास्त्र विभागाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद, १९ व २० डिसेंबर रोजी आयोजन

अमरावतीत भूगर्भशास्त्र विभागाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद, १९ व २० डिसेंबर रोजी आयोजन

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या वतीने बेसिन डायनॅमिक्स, फेसिस आर्किटेक्चर अँड पॅलिओक्लायमेट आणि ३४ वी इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्स या विषयावर १९ व २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात होईल. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून लखनौ येथील नॉर्थ रिजन जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे माजी महासंचालक डी.एम. मोहाबे उपस्थित राहतील. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लेबॉरटरी ए. के. सिंघवी बीजभाषण करतील. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्सचे सचिव एम. रझा, कुलसचिव अजय देशमुख, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख एस. एफ. आर. खाद्री यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

परिषदेचा समारोप २० डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर व इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्सचे अध्यक्ष जी. एन. नायक भूषवतील. कार्यक्रमाला वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागातील बी.पी. सिंह, चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागातील आर. नागेंद्र व आयआयटी पवईचे एस. बॅनर्जी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला भूगर्भशास्त्र विभागाचे संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इंडियन असोसिएशन आॅफ सेडिमेन्टोलॉजिस्ट्सचे संयोजक अशोक श्रीवास्तव व अध्यक्ष जी. एन. नायक यांनी केले आहे.

Web Title: The two-day National Council of Geological Dept of Amravati, organized on 19th and 20th of December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.