अमरावतीत दोन कुटुंबांमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:41+5:302021-07-07T04:14:41+5:30
-------------- कुऱ्हा परिसरातील दुबार पेरणीवरही संकट कुऱ्हा (अमरावती) : पावसाने पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने दडी मारल्याने कुऱ्हा परिसरात दुबार ...
--------------
कुऱ्हा परिसरातील दुबार पेरणीवरही संकट
कुऱ्हा (अमरावती) : पावसाने पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने दडी मारल्याने कुऱ्हा परिसरात दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. ढग येतात, पण पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग फार मोठ्या संकटात सापडला आहे. कपाशी बियाण्याचे कोंब तापत्या उन्हामुळे जळाले आहेत. कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी मागणी भाजप सरचिटणीस सागर शिंगाणे व परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.
-------------
माजी सैनिकांच्या लसीकरणासाठी ईसीएचएस पॉलिक्लिनिक येथे सुविधा केंद्र
अमरावती : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच नागरिकांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी ईसीएचएस पॉलिक्लिनीक येथे सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. सैनिकांचे पुलगाव हेडक्वाटरचे स्टेशन कमांडर बिग्रेडीयर विनय नायर यांच्या मार्गदर्शनात हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. २८ जून रोजी येथे लसीकरणास सुरुवात झाली. दररोज शंभर व्यक्तींचे सुरक्षित लसीकरण केले जाते, असे माजी सैनिक कर्नल विश्वास काळे यांनी सांगितले.