चिखलदरा तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:14 AM2021-01-20T04:14:33+5:302021-01-20T04:14:33+5:30
चिखलदरा : तालुक्यातील चिखली या मोठ्या ग्रामपंचायतीची स्थिती त्रिशंकू आहे. येथे काँग्रेस व प्रहारला अन्य सदस्यांना सोबत घेऊन सरपंच ...
चिखलदरा : तालुक्यातील चिखली या मोठ्या ग्रामपंचायतीची स्थिती त्रिशंकू आहे. येथे काँग्रेस व प्रहारला अन्य सदस्यांना सोबत घेऊन सरपंच पदासाठी कसरत करावी लागणार आहे. चिखली या ११ सदस्यीय ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंह गैलवार यांच्या गटाकडे बरेच वर्षे सत्ता होती. आता त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. निवडून आलेल्या सदस्यांनी राजकीय पक्षाचा शिक्का मारून घेण्यास नकार दिला आहे. सारिका पाटणकर, नंदा मेटकर, राजेश मेटकर, रुक्मिणी कासदेकर, सालकराम बेठेकर, प्रदीप कोगे, प्रवीण भार्वे, श्यामलाल बेठेकर, बाहुली बेठेकर, रुक्मी कासदेकर व रुक्मी दारसिम्बे हे सदस्य ग्रामपंचायतमध्ये पोहोचले आहेत.
-------------------------------------------
दहेंद्रीची सत्ता एकमेव सदस्यावर अवलंबून
चिखलदरा : तालुक्यातील मोठ्या दहेंद्री ग्रामपंचायतीमध्ये तिसऱ्या पॅनेलच्या एकमेव सदस्यावर सत्ताशकट अवलंबून आहे. काँग्रेसचे माजी उपसभापती पुण्या येवले यांच्या पॅनेलचे त्यांच्यासह अस्मिता येवले, संदीप पंडोले, फुडिया जामूनकर असे चार सदस्य आहेत. बीकेडी पॅनेलचे मेघा तोटे, संजू साकोम, पिंकू कासदेकर हे तीन सदस्य असून, भाजपचे रवि बेठेकर, भारती बेठेकर, फुलवती परते असे तीन सदस्य आहेत. गणू जामूनकर हा एकमेव सदस्य कुणाकडे जातो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सरपंचपदाच्या आरक्षण निश्चितीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.
-----------------------------