शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

धामणगाव मतदारसंघात आणखी दोन रेल्वे उड्डाण पुलाला मंजुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:13 AM

फोटो - भगोले २३ एस * * * * * * * * *अंदाजे सहाशे कोटीचे कामाला मंजुरात *माजी ...

फोटो - भगोले २३ एस

* * * * * * * * *अंदाजे सहाशे कोटीचे कामाला मंजुरात

*माजी आ.वीरेंद्र जगताप यांचे प्रयत्न

चांदुर रेल्वे :- धामणगाव विधानसभेतील धामणगाव आणि चांदुर रेल्वे शहरातील महत्वाचे उड्डाण पूल मंजुरीनंतर आता पुन्हा नव्या दोन रेल्वे उड्डाण पूलाला मंजुरात मिळविण्यात माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना यश मिळाले असून त्या सोबत बहुचर्चित चांदुर रेल्वे ते कुऱ्हा रस्त्याच्या बांधकामालाही मंजुरात मिळाली आहे, विशेष म्हणजे कोरोना काळानंतर प्रथमताच मंजुरात मिळून लवकरच हे कामे सुरू होत असल्याची माहिती माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2020 या बजेट मध्ये मतदार संघातील अंदाजे 600 कोटी रुपयांचे कामाला मंजुरात मिळाली आहे त्यात चांदुर रेल्वे येथून जाणाऱ्या अमरावती वर्धा बायपास वरील रेल्वे उड्डाण पूल, मंगरूळ दस्तगीर ते पुलंगाव रस्त्यावरील चिंचोली ते ओकनाथ गावातील रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचा समावेश आहे, यासोबत नागपूर या उपराजधानीला जोडणारा तिवसा मार्गावरील चांदुर रेल्वे- कुऱ्हा रोडचेही बांधकाम होणार असून नांदगाव खंडेश्वर ते राजुरा रस्ता, चांदुर-सोनगाव, बग्गी- राजुरा, या 19 किमी लांबी च्या 5 कोटी रुपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला असल्याचे प्रा जगताप यांनी सांगितले. सोबतच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव ते पापड, वाढोना, हा 21 किमी लांबीचा रस्ता दुरुस्तीसाठीही 2 कोटी, तर नांदगाव ते सावनेर, मोखड, मांजरी म्हसला, रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी 75 लाखाचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.तर नांदगाव तालुक्यातील जनुना, येथे लोणी, मोरगाव जनुना रस्त्यावर 2 कोटी 25 लक्ष रुपयांच्या पुलाचे काम मंजूर झाले आहे. तसेच आशियाई विकास बँकेमार्फत अर्थसहाय्यीत असलेल्या अंजनवती - अंजनसिंगी जुना धामणगाव, देवगाव या रस्त्याच्या 233 कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली असून या रस्त्याचे काम दीड वर्षात पूर्ण होणार असल्याचे ही या पत्रकार परिषदेत प्रा जगताप यांनी सांगितले तर तळेगाव दशासर या रस्त्यावरील 20 किमी लांबीचा 60 कोटी किमतीचे काम ही सुरू झाले असून सदर काम एक वर्षात पूर्ण झाले आहे. तसेच चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्ग यांची दुरुस्ती व सुधारणा करणे या साठी 4 फेब्रुवारी 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती त्यानुसार विधानभवनात बैठक घेऊन मतदार संघातील कामे मंजूर करून घेतल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले. हे सर्व कामे मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे मतदार संघाच्या जनतेच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी आभार मानले.