मेघे अभियांत्रिकीपुढून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:40 AM2020-12-17T04:40:10+5:302020-12-17T04:40:10+5:30

नेमानी गोडाऊन परिसरातील मटक्याचा जुगार उधळला बडनेरा : नेमानी गोडाऊन परिसरात बडनेरा पोलिसांनी नवनीत विष्णूपंत मेहरे (४४, रा. ...

Two-wheeler lampas next to Meghe Engineering | मेघे अभियांत्रिकीपुढून दुचाकी लंपास

मेघे अभियांत्रिकीपुढून दुचाकी लंपास

Next

नेमानी गोडाऊन परिसरातील मटक्याचा जुगार उधळला

बडनेरा : नेमानी गोडाऊन परिसरात बडनेरा पोलिसांनी नवनीत विष्णूपंत मेहरे (४४, रा. कंपासपुरा) या इसमाकडून सट्टापट्टीच्या चिठ्ठ्या जप्त केला. अंगझडतीदरम्यान तो एमएच २७ सीके ८१४० क्रमांकाची दुचाकी सोडून पळाला. त्याच्याविरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

---------

व्यंकय्यापुरा येथे महिलेला काठीने मारहाण

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकय्यापुरा येथे १५ डिसेंबर रोजी मंगेश बघीले याने एका महिलेला काठीने मारहाण केली. यात ती जखमी झाली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------

पीडीएमसीच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास

अमरावती : पीडीएमसीच्या पार्किंगमधून तेथील परिचर निखिल राजू मोहोड (२३, रा. महेंद्र कॉलनी) याची एमएच २७ सीजी ६०९९ क्रमांकाची दुचाकी १३ डिसेंबर रोजी लंपास करण्यात आली. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------

शेगाव नाका येथून दुचाकी लंपास

अमरावती : शेगाव नाका येथील एका डेअरीपुढे लावलेली दुचाकी (एमएच २७ बीएल ४२९०) ११ डिसेंबर रोजी लंपास करण्यात आली. ही दुचाकी घेऊन फिर्यादी महिला दूध खरेदी करण्यासाठी आली होती. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.

------------

उधारीचे पैसे मागितल्याने जिवे मारण्याची धमकी

अमरावती : उधार दिलेले ५०० रुपये मागितल्याने उमेश मनोहर लाडीवकर (४०, रा. अनुराधा कॉलनी) यांना ढकलून त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यात आली व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १५ डिसेंबर रोजी अनिकेत नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Two-wheeler lampas next to Meghe Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.