अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी २४ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांचे संचालन, मू्ल्यांक़न, निकाल प्रक्रिया राबविण्यास हिरवी झेंडी मिळाली आहे. त्याअनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका सादर करून घेताना निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाविद्यालय स्तरावर २ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा, तर ५ नोव्हेबरपर्यंत गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
अमरावती येथील रहिवासी प्रीती राहुल तायडे यांनी अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या महाविद्यालय स्तरावर घेतलेल्या परीक्षांवर आक्षेप घेत स्थगिती मिळण्यासाठी उच्च न्यायालयात १०६५२ अन्वये रीट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २८ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती आर.के. देशपांडे व पुष्पा गणेडीवाल यांच्या पीठासीनासमोर सुनावणी झाली असता, विद्यापीठ परीक्षांंना स्थगिती देण्यात आली नाही. किंबहुना याप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी पुढील तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबर रोजी कुलगुरू चांदेकर यांनी परीक्षांच्या अनुषंगाने निर्गमित केलेले परिपत्रक कायम ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ह्यलोकमतह्णला दिली. येत्या काळात अंतिम वर्षासह अनुशेषाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुकरपणे पार पडतील. परीक्षा, मूल्यांकन, निकाल हे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. तशा सूचना प्राचार्यांना देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
शुक्रवारी सुटीच्या दिवशी परीक्षांचे नियोजन
शुक्रवारी शासकीय सुटी असताना २ नोव्हेबरच्या आत परीक्षांचे नियोजन करण्यासाठी काही महाविद्यालयात परीक्षा घेण्यात आल्यात. शुक्रवारी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी अंजनगाव सूर्जी, दर्यापूर, अचलपूर येथील काहूी महाविद्यालयात भेटी देत परीक्षांचे संचालन जाणून घेतले. प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर यांनी नेर परसोपंत, यवतमाळ येथील परीक्षा केंद्रावर भेटी दिल्यात.
गुरूवारी ३५८८२ परीक्षार्थ्यांनी दिली परीक्षासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयात गुरूवारी सर्व शाखांंच्या ३५८८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यात ऑनलाईन १९०८३ तर, ऑफलाईन १६८२० विद्यार्थ्यांनी ८५८ परीक्षा दिली असून, ९७.६६ टक्केवारी उपस्थिती नोंदविली आहे.