विद्यापीठाची पीएच.डी. परीक्षा होणार ऑफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:12+5:302021-03-27T04:13:12+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पीएच.डी. परीक्षा ऑफलाईन घेण्याचे नियोजन चालविले आहे. ही परीक्षा शिक्षण मंडळ, राज्य सेवा ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पीएच.डी. परीक्षा ऑफलाईन घेण्याचे नियोजन चालविले आहे. ही परीक्षा शिक्षण मंडळ, राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येत आहे. पीएच.डी. परीक्षेला १,०६० नवसंशोधन परीक्षार्थी असणार आहे.
विद्यापीठाने पीएच.डी. परीक्षेच्या अनुषंगाने पेपर सेटींग चालिवले आहे. परीक्षा केंद्रावर ऑफलाईन परीक्षा होतील. एप्रिल महिन्यात पीएच.डी. परीक्षा घेण्याचे नियाेजन करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांचे हॉल तिकीट ऑनलाईन परीक्षा केंद्रावर पाठविले जाणार आहे. विद्यापीठाच्या इतर परीक्षा ऑनलाईन होत असताना पीएच.डी. परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत निर्णय झाला आहे. परीक्षांसाठी एकूण १४ केंद्र असणार आहे. यात यवतमाळ ३, अमरावती ६, अकोला २, बुलडाणा २ तर, वाशिम १ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असतील, अशी माहिती आहे.
-----------------
पीएच.डी. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र, ऑफलाईनद्धारेच नव संशोधकांना या परीक्षांच्या सामोरे जावे लागेल.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ