अन्यायकारक कृषी कायदे, महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:14+5:302021-03-27T04:13:14+5:30
भारत बंदला पाठिंबा, इर्विन चौकात उपोषण अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कायदे शेतकऱ्यावर अन्यायकारक असून, वाढत्या महागाई ...
भारत बंदला पाठिंबा, इर्विन चौकात उपोषण
अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कायदे शेतकऱ्यावर अन्यायकारक असून, वाढत्या महागाई विरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या धोरणावर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला.
जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समनार्थ राज्याचे कार्याध्यक्ष कृणाल पाटील, प्रवत्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आदीच्या उपस्थितीत एक दिवसीय उपोषण करण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीनही अन्यायकारक कृषी कायद्याने मोदी सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीतही प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. चार महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन सुरु आहे. मात्र, याची दखल न घेता मोदी सरकार मनमानी करीत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. भाजप सरकारच्या शेतकरी व जनसामान्यां विरोधातील धोरणाचा यावेळी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक केला. दरम्यान, शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करावे, वाढती महागाई रोखावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, सुरेश निमकर, मोहन सिंगवी, महेंद्र गैलवार, प्रमोद दाळू, सुरेश आडे, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, प्रकाश काळबांडे, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, प्रदीप देशमुख, राजाभाऊ टवलाकर, नितीन दगडकर, अभिजित देवके, भागवंत खांडे, बिटू मंगरोळे, संजय वानखडे, मिश्रीलाल झारखंडे, गणेश आरेकर, विनोद चौधरी, राजाभाऊ टवलारकर, किशोर किटुकले, प्रकाश काळबांडे, प्रशांत डवरे, निलिमा काळे, प्रदीप हिवसे, सलीम बेग, देवायनी कुर्वे, राजा बागडे, सागर देशमुख, निसार मन्सुरी, मतीन अहमद, गजानन राजगुरे, मनोज भेंले, श्रीकांत गावंडे, अभिनंदन पेंढारी, नितीन कनोजिया, श्रीकांत झोडपे, बबलू बोबडे, मुकद्दर पठाण, दीपक सवाई, संदीप रिठे, मनोज देशमुख, शिवाजी बंड, दिवाकर देशमुख सहभागी झाले होते.
बॉक्स
कायदे रद्द होईपर्यत आंदोलन सुरूच ठेवू
केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी व जनहित विरोधी धोरण राबवून उद्योगपतींचे पाठीराखे सरकार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे लादून शेतकरी व शेती उद्ध्वस्त करू पाहत आहे. मात्र, भाजप सरकारचा हा खेळ काँग्रेस पक्ष कदापिही चालू देण्यार नाही, असा इशारा कुणाल पाटील, बबलू देशमुख, बबलू शेखावत, वीरेंद्र जगताप, बळवंत वानखडे, अतुल लोंढे आदी नेत्यांनी उपस्थिताना संबोधित करताना दिला.