प्रत्येक महसुली गावात होणार सेंद्रिय शेतीचा प्रयोग

By admin | Published: February 25, 2016 12:09 AM2016-02-25T00:09:14+5:302016-02-25T00:09:14+5:30

रासायनिक शेतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला बळ ...

Use of organic farming will be done in every revenue village | प्रत्येक महसुली गावात होणार सेंद्रिय शेतीचा प्रयोग

प्रत्येक महसुली गावात होणार सेंद्रिय शेतीचा प्रयोग

Next

कृषी विभागाची योजना : १०० टक्के अभियानावर राबविणार अभियान
अमरावती : रासायनिक शेतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नसल्यामुळे कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला बळ देण्यासाठी अभियान राबविले आहे. या योजनेत केंद्र व राज्य शासन अनुदान देणार आहे.
पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खताचा बेसुमार वापर होत आहे. यामुळे जमिनीचा पोत खराब होऊन नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे वैद्यकीय अहवालअंती स्पष्ट झाले आहे. यामुळे अनेक रोगांचा व शारीरिक व्याधी नागरिकांना होत आहे. अशीच स्थिती राहल्यास भविष्यात बिकट स्थिती येणार आहे. अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय कुठलाच पर्याय नाही याचा विचार करुन शासनाने शास्वत शेती अभियानांतर्गत व परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर सेंद्रिय शेती अभियान गावपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देणे तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय कृषी मालाला बाजारपेठ करुन देण्याची जबाबदारी आता शासनाने घेतली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Use of organic farming will be done in every revenue village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.