ऊर्ध्व वर्धाचे कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:59 AM2017-12-31T00:59:25+5:302017-12-31T00:59:37+5:30

येथून वाहणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला ऋषी महाराज मंदिराजवळ मोठे भगदाड पडले असल्याने दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्य होत आहे. या पाण्यामुळे लगतच्या बागाला तलावाचे स्वरूप आले आहे.

Vertical wavelength canal splinter | ऊर्ध्व वर्धाचे कालव्याला भगदाड

ऊर्ध्व वर्धाचे कालव्याला भगदाड

googlenewsNext
ठळक मुद्देलाखो लीटर पाण्याचा अपव्यय : परिसराला तलावाचे स्वरूप, दुरुस्ती केव्हा?

सूरज दाहाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : येथून वाहणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला ऋषी महाराज मंदिराजवळ मोठे भगदाड पडले असल्याने दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्य होत आहे. या पाण्यामुळे लगतच्या बागाला तलावाचे स्वरूप आले आहे. या भगदाडाचे स्वरूप पाहता एखादवेळी कालवाच फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, या विभागाला अद्याप जाग आलेली नाही, ही शोकांतिका आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या कालव्याद्वारा रबी हंगामाचे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, लघु कालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आलेली नाही. यामुळे कालव्याला जागोजागी छोटे-मोठे भगदाड पडले असून, त्यामधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. जिल्ह्यात हजारांवर गावांत पाणीटंचाईचे सावट असताना उपलब्ध असलेले पाणी संबंधित विभागाच्या बेपर्वाईने वाया जात आहे. यामुळे दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून कालव्याच्या पाण्याचा वेग देखील मंदावत आहे. त्यामुळे आगामी काळात या कालव्याद्वारे होणारे सिंचन देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंत्याचेदेखील या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष असल्यानेच कालव्यांची स्थिती खराब होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला. यासंदर्भात या उपविभागाचे उपअभियंता यांच्याशी संपर्क सााधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

Web Title: Vertical wavelength canal splinter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.