अमरावती : गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने महिलेवर कारमध्ये अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपीला रविवारपर्यंत पीसीआर मिळाला असून, ३५ वर्षीय पीडित महिलेनेच आरोपीचे घर जुलै महिन्यातच परस्पर विकून फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपीने स्वत: ही माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. पीडित महिला व अन्य दोन अल्पसंख्याक आरोपीविरुद्ध नागपुरीगेट ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा जुलै महिन्यात नोंदविण्यात आला होता.
आरोपी डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने ते संस्थात्मक क्वारंटाईन होते. महिलेची यापूर्वीच आरोपीशी ओळख होती. त्यामुळे महिलेने परस्पर आरोपीचे घर दोन अल्पसंख्याक व्यक्तींना विकल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संदर्भात आरोपी डॉक्टर लच्छुराम जाधवानी (५८) याने नागपुरीगेट ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून ८ जुलै २०२० रोजी पीडित महिला व अन्य दोघांविरुद्ध भादंविचे कलम ४२० अन्वये नागपुरीगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपीची पीडित महिलेशी सन २०१४ मध्ये सहा वर्षांपूर्वी ओळख झाल्याचेही चौकशीत पुढे आो आहे. फसवणुकीचा गुन्हा नोंदविल्यानंतर पाच महिन्यांनी अत्याचाराचे प्रकरण समोर आले. त्यामुळे गुन्हा जरी दाखल झाला असला तरी या घटनेत तर्कवितर्क लावण्यात येत आहे. बयाणात आणखी यासंदर्भात काही बाबींचा खुलासा करण्यात आला. परंतु तपासाच्या दृष्टिकोनातून बयाणात नोंदविलेली पोलिसांनी गुपित ठेवल्याचे सांगितले. पुढील तपास पीएसआय ज्योती बळेगावे करीत आहेत. आरोपीचा पीसीआर रविवारी संपणार आहे.