करारनाम्याचे उल्लंघन; तरीही वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:33 AM2018-06-08T01:33:19+5:302018-06-08T01:33:19+5:30

शहरातील उड्डाणपुलाखाली पे अँड पार्कचा विषय अंबानगरीतील नागरिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या ठिकाणी कारारनाम्यात नमूद अनेक नियम व अटींचे उल्लघंन होत असताना कारवाई करण्याऐवजी वाहनधारकांकडून पठाणी वसुली करण्यात येत आहे.

Violation of the contract; Still recovering | करारनाम्याचे उल्लंघन; तरीही वसुली

करारनाम्याचे उल्लंघन; तरीही वसुली

Next
ठळक मुद्दे३७ गाळ्यांवर पार्किंगचे पैसे : आवश्यक सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील उड्डाणपुलाखाली पे अँड पार्कचा विषय अंबानगरीतील नागरिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या ठिकाणी कारारनाम्यात नमूद अनेक नियम व अटींचे उल्लघंन होत असताना कारवाई करण्याऐवजी वाहनधारकांकडून पठाणी वसुली करण्यात येत आहे.
महापालिकेच्या बाजार परवाना विभागामार्फत ६० हजार ३ रुपये दरमहा दरानुसार पे अँड पार्कचा करार सहा महिन्यांकरिता केला आहे. कंत्राटदाराने दोन महिन्यांचा १ लाख २० हजार ६ रुपयांचा धनादेश दिला तसेच १ लाख २० हजारांची बँक गॅरंटी ठेवली आहे. महानगरपालिकेकडे उत्पन्नवाढीची अनेक साधने असताना पे अँड पार्कमधूनच जनतेच्या खिशाला कात्री लावावी जात आहे. ३७ गाळ्यांवर वसुलीसाठी १५ युवकांची नेमणूक केली आहे. मास्टर मेडिकल व रोहित मेडिकलसमोरील गाळे हे खुले आहे. मास्टर मेडिकलसमोरील गाळ्याच्या ठिकाणी महिलांसाठी फायबर टॉयलेट अपेक्षित होते. पण, मनपाने ते लावले नाही. त्यामुळे येथे वसुली करू नये, असे सुचविण्यात आले आहे.
ड्रेस कोड आहे कुठे?
वसुली नियुक्त कामागारांना कंत्राटदाराकडून विश्षिट ड्रेस कोड असणे आवश्यक आहे. ती त्याची ओळख असते. परंतु, या ठिकाणी कामगार म्हणून कुठल्याही कोपऱ्यातून व्यक्ती पुढे उभी राहते आणि पार्किंगकरिता पैसे मागते. हा प्रकार म्हणजे करारनाम्याचे उल्लघंन ठरते. कामाच्या ठिकाणी संस्थेचे ओळखपत्र अपेक्षित असताना, तेही अनेकांजवळ नसल्याचे निदर्शनास आले.
कामगारांना सुविधा नाही
कंत्राटदाराने पे अँड पार्ककरिता नियुक्त केलेल्या व्यक्तीचा विमा करून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी १५ युवकांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी एकाही कामगाराचा कंत्राटदाराकडून विमा करून घेतला नसल्याची माहिती आहे.

Web Title: Violation of the contract; Still recovering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.