शालांत परीक्षांच्या मुहूर्ताची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:29+5:302021-01-02T04:11:29+5:30
अमरावती : दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार, याबाबत राज्य शासनाने अद्याप स्पष्ट घोषणा न केल्याने पालकांमध्ये संभ्रम ...
अमरावती : दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार, याबाबत राज्य शासनाने अद्याप स्पष्ट घोषणा न केल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा झाल्याने राज्य मंडळानेही वेळापत्रक जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, परीक्षा नेमकी कधी होणार, याबाबत काहीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परीक्षेला नेमका किती अभ्यासक्रम राहील, पेपर पॅटर्न कसा असेल, तोंडी व लेखी गुणांबाबत काय निर्णय होणार, कोविडच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीत काही बदल आहेत का, याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. त्यामुळे सर्वांच्या शंका-कुशंका दूर होण्यास मदत होईल, अशी मागणी पालकांमधून व्यक्त होत आहे.