आम्ही आंदोलन केलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:18+5:302021-06-01T04:10:18+5:30

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या हिंदू स्माशानभूमीत कोरोना काळात मृत्यूचे प्रमाण वाढल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी विद्युत दाहिनीतून केला जात ...

We did not protest | आम्ही आंदोलन केलेच नाही

आम्ही आंदोलन केलेच नाही

Next

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या हिंदू स्माशानभूमीत कोरोना काळात मृत्यूचे प्रमाण वाढल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी विद्युत दाहिनीतून केला जात आहे. सध्या आकडा १० च्यावर असल्याने सतत विद्युत दाहिनी सुरू राहिल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास वाढल्याचा मुद्दा काही नागरिकांनी नगरसेवकांकडे रेटला. भाजपच्या नगरसेवकांनी त्याबाबत पाऊल उचलले. मात्र, त्यांच्या समन्वयाचा अभाव राहिल्याने सामान्यांचा प्रश्न सुटू शकला नाही. परिणामी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी बोलावल्याचे पप्पू पाटील यांनी सांगितले. मनसेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहचले. तोडफोडीत मशिनचे सुटे भाग फेकाफेक केल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव हे पथकासह घटनास्थळी पोहचले. मात्र, तेव्हा त्यांना मनसेचे पदाधिकारी तेथे दृष्टीस पडले नाही. स्थानिक लोकांची गर्दी जमलेली होती. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांना ते अटक करू शकले नाही. त्यामुळे मनसेचा या आंदोलनात सहभाग नसून, कोरोना काळात प्रसासनाला मदत करण्याचा पवित्रा मनसेने घेतल्याची माहिती पप्पू पाटील यांनी दिली. यावेळी महानगरप्रमुख संतोष बद्रे, हर्षल देशमुख, नितेश शर्मा, हर्षल ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: We did not protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.