दारूचे दुकान बंद अवैध दारूचे काय ?

By admin | Published: May 26, 2017 01:43 AM2017-05-26T01:43:43+5:302017-05-26T01:43:43+5:30

महिलांनी आक्रमक आंदोलन केल्यामुळे कोकर्डा येथील देशी दारूचे दुकानाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बुधवारी रात्री उशिरा सील लागले.

What about illegal alcohol in a liquor shop? | दारूचे दुकान बंद अवैध दारूचे काय ?

दारूचे दुकान बंद अवैध दारूचे काय ?

Next

दुर्लक्ष : खल्लार पोलिसांची भूमिका संशयास्पद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिलांनी आक्रमक आंदोलन केल्यामुळे कोकर्डा येथील देशी दारूचे दुकानाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बुधवारी रात्री उशिरा सील लागले. पण हे दुकान जरी बंद झाले असले तरी अवैध दारू विक्री मात्र थांबली नाही. त्यामुळे अवैध दारू विक्रींवर अंकुश कोण लावणार, असा प्रश्न विचारला जात आहे. याप्रकरणी खल्लार पोलिसांची भूमिका संशयास्पद असून अनेक दिवसापासून येथे दारू विकली जात होती.
देशी दारूच्या दुकान अवैधरित्या बिअर विकली जात होती. या परिसरात वरील मटका लावला जात होता. पण कुठलीही कारवाई आतापर्यंत खल्लार पोलिसांनी केली नाही. काही अंतरावरच कर्मयोगी गाडगेबाबांची जन्मभुमि शेंडगाव आहे. या ठिकाणचे नागरिक कोकर्डा येथे दारू पिण्यासाठी येत होते. त्यामुळे शेंडगावसह परिसरातील इतरही गावच्या महिला शक्तींनी एकत्र येऊन दारूचे दुकान बंद करण्यासासंदर्भात व अवैध दारू थांबविण्यासंदर्भात आंदोलन केले. त्या आंदोलनाला यशही आले. तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी यांनी दारूच्या दुकानाताल सिल ठोकले. २ जून रोजी या प्रकरणी ग्रामठराव होणार आहे. यासाठी विशेष ग्रामसभा सुध्द बोलाविण्यात आली आहे. दारूच्या दुकानाच्या विरोधात यावेळी मतदान प्रक्रिया सुध्दा राबवायांची आहे. त्यामुळे यानंतर या दुकानाचे भाग्य अवलंबून राहणार आहे. कोकर्डा येथील देशी दारूचे दुकान जरी बंद झाले असले तरी मद्यपींनी व अवैध दारू विकणाऱ्यांनी आपला मोर्चा हा कापूसतळणी येथी वळविला आहे. येथील दारूचे दुकान सुरू असल्यामुळे व ते गाव फक्त सहाच किमी असल्याने येथून दारूच्या पेट्या विकत अणून अवैध दारू विकण्याचा व्यवसाय काही लोकांनी या ठिकाणी थाटला आहे.

Web Title: What about illegal alcohol in a liquor shop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.