इतवारा बाजारात किती ही गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 06:00 AM2020-06-26T06:00:00+5:302020-06-26T06:00:02+5:30
महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागरिक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सावटात भयभीत झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदी करता यावे, यासाठी दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. हे वारंवार सांगितले जात असूनही इतवारा बाजारात बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अमरावतीकरांनी गर्दी केली. ‘स्वत:ला जपा, सुरळीत काळजी घ्या’ या ‘कोरोना नियंत्रणा’चा विसर पडल्यागत नागरिकांना येथे संचार होता, हे विशेष.
महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागरिक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सावटात भयभीत झाले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू खरेदी करताना चार तासांच्या कालावधीत जी मिळेल ती वस्तू खरेदी करण्याची मानसिकता नागरिकांची झाली आहे.
एकच गर्दी झाल्यामुळे इतवारा बाजारात काहीवेळ रेटारेटी झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचनेला यावेळी बगल देण्यात आली. वस्तू खरेदीच्या वेळी झालेल्या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले. अखेर महापालिका फिरत्या पथकाने या गर्दीवर अंकुश मिळविला. दुकानदारांना नियोजनबद्धतेने वस्तू विक्री करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. नागरिकांनी सामाजिक कर्तव्य आणि प्राप्त परिस्थितीचा विचार करून वर्तन करावे, अशा सूचना महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी इतवारा बाजारातील गर्दी पांगविताना केल्यात.
आता इतवारा बाजारात मिळेल फक्त किराणा
इतवारा बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता येथे केवळ किराणा माल मिळणार आहे. इतवारा बाजारात फक्त किराणा दुकाने सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाजी विक्रीची दुकाने बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहे.
अॅकेडमिक स्कूलमध्ये भाजी विक्री होणार
वलगाव मार्गावरील अॅकेडमिक स्कूलच्या प्रांगणात आता भाजीपाला विक्री होणार असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. इतवारा बाजारात भाजीपाला खरेदीदरम्यान उसळणारी गर्दी ही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे इतवारा बाजारातून अॅकेडमिक स्कूलच्या प्रांगणात भाजी विक्री होणार आहे.