प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:40+5:302021-01-14T04:11:40+5:30

अमरावती : भंडारा येथे नवजात शिशू केंद्राला लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश ...

When is the fire audit of primary health centers? | प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट केव्हा?

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट केव्हा?

googlenewsNext

अमरावती : भंडारा येथे नवजात शिशू केंद्राला लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील १४ तालुक्यांत येत असलेल्या ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अद्याप ऑडिटच झाले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ऑडिट करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.

भंडारा येथील दुर्घटनेत संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे पितळ उघड पडल्याने शासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून, घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले किंवा नाही याची माहिती शासनाने मागविली आहे. ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेले नाही ते तात्काळ करण्याचे आदेश देण्याच्या सूचना शासनाकडून आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती मागविली असता ५९ आरोग्य केंद्रांत फायर ऑडिटच झालेले नाही. मात्र आरोग्य केंद्रांत अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले असून त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष नसल्याने आता आरोग्य विभागाने भंडारा येथील घटनेनंतर खबरदारीसाठी उपाययोजना करण्याचे दृष्टीने हालचाली सुरू केलेल्या आहेत.

बॉक्स

ही आहेत आरोग्य केंद्र

अमरावती तालुक्यातील अंजनगाव बारी, शिराळा, माहूली जहांगीर, वलगाव, भातकुलीमधील भातकुली, आष्टी, खोलापूर, दर्यापूरमध्ये आमला एंडली, रामर्तीर्थ, येवदा, चंद्रपूर, अंजनगाव सुर्जी, सातेगाव, कोकर्डा, कापूसतळणी, अचलपूरमध्ये पथ्रोट, धामणगाव गढी, येसुर्णा, चांदूर बाजारमध्ये करजगाव, आसेगाव पूर्णा, तळवेल, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई, अंबाडा, हिरवखेड, खेड, विचोरी, वरूडमध्ये राजुरा बाजार, लोणी, शेंदूर्जनाघाट, आमनेर, पुसला, तिवस्यातील तळेगाव ठाकूर, मार्डी, कुऱ्हा, धामणगाव रेल्वेमध्ये मंगरूळ दस्तगीर, अंनजसिंगी, निबोंली, तळेगाव दशासर, चांदूर रेल्वेत आमला विश्र्वेश्वर. पळसखेड, घुईखेड, नांदगाव खंडेश्र्वरमध्ये मंगरूळ चव्हाळा, लोणी टाकळी, पापळ, सातरगाव, धामक, चिखलदरा तालुक्यात सलोना, हतरू, सेमाडोह, काटकु्ंभ, टेब्रुसोंडा, धारणी तालुक्यात कळमखार, बिजूधावडी, धुळघाट रोड, साद्राबाडी, बैरागढ आणि हरिसाल याप्रमाणे आरोग्य केंद्र आहेत.

कोट

प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडिट व ईलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट करण्याच्या अनुषंगाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच पीएचसीचे ऑडिट केले जाईल.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: When is the fire audit of primary health centers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.