वरूड तालुक्यात संत्रा प्रकल्पाची उभारणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:13 AM2021-03-21T04:13:41+5:302021-03-21T04:13:41+5:30

दर पंचवार्षिकला निव्वळ घोषणा : २० हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन वरूड (अमरावती) : सन २०२१ च्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यातील ...

When was the Orange Project set up in Warud taluka? | वरूड तालुक्यात संत्रा प्रकल्पाची उभारणी केव्हा?

वरूड तालुक्यात संत्रा प्रकल्पाची उभारणी केव्हा?

Next

दर पंचवार्षिकला निव्वळ घोषणा : २० हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन

वरूड (अमरावती) : सन २०२१ च्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी वरूड व मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, वरूड-मोर्शीकरांसाठी संत्रा प्रक ल्पाची घोषणा नवी नाही. संत्रा उत्पादकांना प्रतीक्षा आहे ती अर्थसंकल्पातील घोषणेच्या अंमलबजावणीची, संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणीची.

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास असलेला वरुड तालुका भूजल पातळी खालावल्याने वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. तरीदेखील नगदी पीक म्हणून येथील शेतकरी संत्रा पिकवितो. मात्र, बाजारपेठ नसल्याने मृग, आंबिया बहारालाच संत्र्याचे भाव पाडले जातात. एकीकडे उद्योगाअभावी संत्र्यावर प्रक्रि या होऊ शकत नाही. संत्र्यासह मोसंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग आल्यास संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येणार, अशी येथील शेतकºयांची भाबडी आशा आहे. मात्र, प्रत्येक अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडतो. डीपीआर बनविण्याची वेळ आली की, येथील प्रकल्प दुसरीकडे पळविण्याचा घाट रचला जातो. मोर्शी व वरूड तालुक्यात अनेकदा संत्रा प्रकल्पांची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात येथे संत्रा प्रकल्प आणण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. आता पून्हा अत्याधुनिक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाली. अपेक्षा पल्लवित झाल्या असल्या तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारणार काय? अशी शंका संत्रा उत्पादकांना आहे. तर यापूर्वी आलेले काही प्रकल्प बंद पडले तर कुणी नांदेडला पळविले. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथील संत्रा प्रकल्प उभारणीच्या तिसºया दिवशीपासून बंद पडला आहे.

नावलौकीक लयाला

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड तालुक्याचा नावलौकीक आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर जमिनीत संत्रा आहे. मात्र पाणी टंचाईचा प्रश्न उदभवल्याने हजारो संत्रा बागांवर कुºहाडी चालल्या. यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया वाळंवट होण्याच्या मार्गावर होता. येथील कृषकांनी एकापेक्षा एक असे प्रयोग करुन ६७ वर्षात संत्रा जगविला. मात्र, तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने आलेली संत्री व्यापाºयांना विकण्याशिवाय संत्रा उत्पादकांकडे अन्य पर्यायच उपलब्ध झाला नाही. स्वबळावर उपाययोजना करुन संत्रा जगविण्याचे प्रयत्न सुरु आहे. संत्रा फळांना परप्रांतिय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक डबघाईस आला आहे.

बॉक्स २

असे आलेत न् गेलेत

तालुक्यात १९५७ मध्ये शेंदूरजनाघाटमध्ये पहिली ज्यूस फॅक्टरी सहकारी तत्वावर उभारली गेली. त्या काळात देशाच्या मुख्य शहरात ज्यूस पाठविण्याचा प्रयत्न झाला. राजाश्रय न मिळाल्याने पाच वर्षात फॅक्टरी कर्जबाजारी होवून ती जागा मध्यवर्ती बॅकेला विकावी लागली. नंतर वरुडमध्ये सोपॅक ही खासगी संत्रा प्रक्रिया करणारी फॅक्टरी १९९२ मध्ये उभी राहिली. तीही बंद पडली. तत्कालीन कृषि मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी सिंचनासह मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे शासकिय संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला. तोही सुरु होताच बंद पडला. यानंतर हा प्रकल्प एका संत्रा उत्पादक संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आला. मात्र त्यातून प्रक्रिया झालीच नाही

सेंट्रल डेस्कसाठी

Web Title: When was the Orange Project set up in Warud taluka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.