सहकार क्षेत्र मजबूत करण्याकरिता प्रयत्न करणार - ना. बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:02+5:302021-09-06T04:16:02+5:30

फोटो - कडू ०४ ओ वरूड : ग्रामीण भाग सहकार क्षेत्रावर अवलंबून असून, सहकार क्षेत्राकरिता काही नवीन अटी-नियम सरकारने ...

Will try to strengthen the co-operative sector - no. The baby is bitter | सहकार क्षेत्र मजबूत करण्याकरिता प्रयत्न करणार - ना. बच्चू कडू

सहकार क्षेत्र मजबूत करण्याकरिता प्रयत्न करणार - ना. बच्चू कडू

Next

फोटो - कडू ०४ ओ

वरूड : ग्रामीण भाग सहकार क्षेत्रावर अवलंबून असून, सहकार क्षेत्राकरिता काही नवीन अटी-नियम सरकारने लागू केले आहे. ते शिथिल करण्याकरिता तसेच सहकार क्षेत्र प्रबळ आणि सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि विकासक्षेत्र कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

डेबूजी महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात ना. बच्चू कडू यांनी सभेला संबोधित केले. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. देवेंद्र भुयार, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, जरूडचे सरपंच सुधाकर मानकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, बुलडाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक राठी, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळू पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र सुरजुसे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वरूड शाखेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुधाकर मानकर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी राजेंद्र साबळे आणि रोशन दारोकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला उत्क्रांती नागरी पतसंस्थेचे रामराव वानखडे, जरुड तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सोपान ढोले, भावना सातपुते, गणेश देशमुख पतसंस्थेचे संचालक अशोक दारोकर, रमेश मालधुरे, नामदेव वसुले आदी उपस्थित होते. संचालन विष्णू सालपे, प्रास्ताविक आणि आभार अध्यक्ष रवींद्र सुरजुसे यांनी मानले.

Web Title: Will try to strengthen the co-operative sector - no. The baby is bitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.