शक्ती विधेयकास मान्यता दिल्याने महिला आनंदित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:21+5:302020-12-14T04:29:21+5:30

पान ३ पालकमंत्र्यांचा सन्मान : तिवसा : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी तसेच कायद्यांची ...

Women happy with the passage of the Shakti Bill | शक्ती विधेयकास मान्यता दिल्याने महिला आनंदित

शक्ती विधेयकास मान्यता दिल्याने महिला आनंदित

Next

पान ३

पालकमंत्र्यांचा सन्मान :

तिवसा : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी तसेच कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या प्रस्तावित कायद्याला विधिमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या शुक्रवारी तिवसा येथे आल्या असता, काँग्रेस कमिटीच्या महिलांनी त्यांचे हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पेढे वाटून जल्लोष केला.

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा केला होता. तसा राज्यातदेखील कठोर कायदा व्हावा, अशी मागणी होती. शक्ती कायदाने महिला, मुली व बालकांना बळ मिळेल व जो चुकीचे कृत्य करेल त्याला लवकर शिक्षा मिळेल. ना. यशोमती ठाकुरांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हा कायदा अस्तित्वात आल्याने तिवसा येथील महिलांनी त्यांचे महिलांनी स्वागत केले. पेढे भरवले. यावेळी काँग्रेस महिला शहराध्यक्षा रूपाली काळे, स्वाती कुकडे, संगीता वाट, सारिका कांदे, माया धांडेसह महिला उपस्थित होत्या.

--------

Web Title: Women happy with the passage of the Shakti Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.