यशोमती ठाकूर यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:41 PM2018-10-22T22:41:00+5:302018-10-22T22:41:18+5:30

तिवसा विधानसभा मतदारसंघातील महावितरणच्या वेळकाढू धोरणाचा शेतकऱ्यांसह नागरिकांना फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे विजेच्या विविध मुद्यावर सोमवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या दिला.

Yashomati Thakur stays at the office of Mahavitaran | यशोमती ठाकूर यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

यशोमती ठाकूर यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

Next
ठळक मुद्देसर्व मागण्या लेखी स्वरुपात मंजूर : अधिकाऱ्यांचे नमते

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघातील महावितरणच्या वेळकाढू धोरणाचा शेतकऱ्यांसह नागरिकांना फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे विजेच्या विविध मुद्यावर सोमवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या दिला.
भारनियमानामुळे मोझरी, गुरूदेव नगर व तिवसा येथील पाणीपुरवठा खंडीत आहे. नागरिकांना याचा फटका बसत आहे. २३ आॅक्टोबरपासून गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू होईल. त्यामुळे येथील भारनियमन कमी करावे. आसेगाव, माहुली, शिराळा येथील वीज उपकेंद्रातील रोहित्राच्या क्षमतेत वाढ करावी, कृषी पंपाच्या वीज वाहिनीचा लोड कमी करावा, अशा विविध वीजेच्या प्रश्नावर महावितण विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतरही त्याची दखल न घेतल्याने २२ आॅक्टोबर रोजी आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत अधीक्षक अभियंताना याचा जाब विचारत ठिय्या दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांसहन नागरिकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांना न्याय दिल्याशिवाय येथून न हटण्याचा प्रवित्रा आ. ठाकूर व सहभागी आंदोलकांनी घेतला. अखेत महावितरणच्या अधिकाºयांनी नमते घेत महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती गुजर, अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे, कार्यकारी अभियंता ढोके, तिवसा येथील उपअभियंता तायडे आदींनी सर्व मागण्या लेखी स्वरूपात मंजूर केल्यात. या आंदोलनात झेडपी सभापती जयंत देशमुख, मुकदर खॉ पठाण, वैभव वानखडे आदी काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलनातील मागण्यांबाबत लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये आसेगाव व शिराळा येथील उपकेंद्रात ३.१५ ट्रान्सफार्मरऐवजी ५ मेगाव्हॅट क्षमतेचे रोहीत्र ३१ आॅक्टोबरपर्यंत बसविणार, माहूल उपक्रेदात ५ मेगाव्हॅट ऐवजी १० मॅगाव्हॅट क्षमतेचे रोहीत्र येत्या २६ आॅक्टोबरपर्यंत बसविले जाईल, यासोबतच देवरा, देवरी कृषी वाहिनीचे दोन भाग केले जाणार आहेत. तालुक्यात रोहीत्र दुरूस्तीचे साहीत्य पुरविण्याचे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले.
कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाला ठोकले कुलूप
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नाकार्तेपणामुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्या, कृषिपंपाना वीजजोडणी, गुरूदेव नगर, तिवसा येथील पाणीपुरवठा व भारनियमनाच्या मुद्यावर तिवसा विधानसभा युवक काँग्रेसने आक्रमक होत महावितरणचे कार्यकारी अभियंता देवहाते यांच्या दालनाला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. या आंदोलनात नगरपंचायत अध्यक्ष वैभव वानखडे, रितेश पांडव, लुकेश केने, अंकुश जुनघरे, सौरभ किरकटे, उमेश महिंगे, अंकुश बनसोड, विशाल पवार, अतुल यावलीकर आदींचा समावेश होता.

Web Title: Yashomati Thakur stays at the office of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.