कोरोनाच्या सावटात यंदा होळीचा बेरंग, धूलिवंदनास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 05:00 AM2021-03-26T05:00:00+5:302021-03-26T00:20:02+5:30
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने आदेश व निर्देश पारित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : होळी, धूलिवंदन हा पारंपरिक सण आहे. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १६ मार्च रोजी काढलेल्या सुधारित आदेशानुसार सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. त्यामुळे यंदा होळी, धूलिवंदन सणावर विरजण पडणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर महसूल, महापालिकेकडून कारवाईसाठी विशेष पथक नेमली जाणार आहेत
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने आदेश व निर्देश पारित करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग केल्यास कोणत्याही व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध असेल, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे होळी अथवा धूलिवंदनाच्यावेळी लोक एकत्र येतील आणि कोरोनाचा संसर्ग वाढेल. या अनुषंगाने होळी, धूलिवंदन सण सार्वत्रिक साजरा करता येणार नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केली आहे.
सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, रिसोर्ट किंवा सार्वजनिक सभागृहांत धूलिवंदन साजरे करण्यास मनाई असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेशात नमूद केले आहे. गतवर्षी कोरडी होळी साजरी करण्याचे आदेश होते. मात्र, यंदा धूलिवंदनाची परवानगी प्रशासनाने स्पष्टपणे नाकारली आहे. कोरोनामुळे हे पाऊल उचलले आहे.