सहा हजार गुणांचे राहणार यंदाचे स्वच्छ सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:30 AM2020-12-16T04:30:14+5:302020-12-16T04:30:14+5:30
अमरावती : महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ सध्या राबविण्यात येत आहे. यावेळी हे अभियान ६ हजार ...
अमरावती : महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ सध्या राबविण्यात येत आहे. यावेळी हे अभियान ६ हजार गुणांचे राहणार आहे.
सेवास्तरावरील प्रगतीसाठी अभियानात २४ गुण आहेत. यामध्ये कचरा संकलन व वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट तसेच शाश्वत स्वच्छता हे भाग राहतील. याशिवाय प्रमाणीकरणाला १८०० गुण आहेत. यामध्ये कचरामुक्त शहर, जीएफसी स्टार रँकिंग, शहर हगणदरीमुक्त असल्याबाबत ओडीएफ स्टेटस) तसेच यंदाचे स्वच्छ सर्वेक्षणात ओडीएफ आणि क्यूसीआय टीमद्वारे पूर्वतपासणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शहराचे पूर्ण प्रमाणीकरण झाले असल्यास जास्तीत जास्त गुणांकन प्राप्त होणार आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया व प्रत्यक्ष निरीक्षण याला यंदा १८०० गुण राहतील. शहरातील नागरिकांकडून केंद्रीय समितीद्वारे शहरातील स्वच्छतेसंदर्भात आणि कामकाजाबाबत काही प्रश्नांची फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष निरीक्षण करतेवेळी विचारणा होणार आहे. माहिती, शिक्षण, संवाद आणि वर्तनातील बदलांबाबत शहरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची तपासणी सोशल मीडियाद्वारे व प्रत्यक्ष निरीक्षण करतेवेळी करण्यात येणार आहे. या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने तृतीय पक्षामार्फत शहराची पाहणी करण्यात येणार आहे