परिसरातील वडनेर गंगाई येथील आरोपी फैय्याज उद्दीन (५०) यांच्या किरणा दुकानावर धाड टाकली असता सुगंधित तंबाखू अवैद्ध विक्रीच्या उद्देशातून दुकानांत ठेवल्याचे आढळून आले. त्यांच्या दुकानांमधून १९५० रुपयांचा माल जप्त केला. वडनेर गंगाई येथील मोहम्मद इकबाल मो़, इद्रिस (३०) यांच्या दुकानाची झडती घेतली असता, त्यांच्याजवळून १८०० रुपयांचा विमल सुगंधित गुटखा जप्त केला. लोतवाडा येथील आरोपी संतोष गोविंदराव खराटे (५२) यांच्या किरणा दुकानाची झडती घेतली असता, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित गुटका एकूण ३८०० रुपयांचा पान मसाला जप्त केला. त्यामुळे अवैध गुटखाविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले. या कारवाईत येवदाचे ठाण्याचे एएसआय दिलीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, कॉन्स्टेबल संजय रायबोले, अर्जुन मुंडे, सुधाकर चव्हाण, अनिल जाधव यांचा सहभाग होता.
येवदा पोलिसांची गुटखा विक्री करणार्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:11 AM