जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रास योग प्रशिक्षणाचे आयोजन होत असून, त्याठिकाणी नियुक्त योगप्रशिक्षक दिवसाला दोन सत्रांमध्ये योग शिबिर घेतात. आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये पुरुष व महिला, बालक, ज्येष्ठ आदी लाभार्थी या शिबिरात सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेने त्यांचे स्वस्थ राहण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. सध्या कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करून प्रशिक्षण द्यावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
झेपी आरोग्य विभागाव्दारे योग प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:14 AM