अमरावती : प्रशासनातील कामकाज सुलभ पारदर्शक व गतिमान होण्यासाठी जिल्हा परिषदेत सोमवार, २८ डिसेंबरपासून स्वच्छ प्रशासन अभियानास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व खातेप्रमुखांना सूचना लेखा पत्राव्दारे दिल्या आहेत. १० जानेवारीपर्यंत हा उपक्रम चालणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा परिषद संवर्ग कर्मचाऱ्यांची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणे, अभिलेख वर्गीकरण वापरात नसलेल्या कार्यालयीन वस्तूचे निर्लेखन करणे, कार्यालयाची वास्तू व परिसर स्वच्छता करणे गठ्ठे पद्धतीनुसार दप्तराची मांडणी प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे विभागीय चौकशी प्रकरणे निकाली काढणे अनधिकृत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई पदोन्नती प्रकरणी जात पडताळणी प्रमाणपत्र बिंदूनामावली नोंदवही अद्ययावत करणे, सेवा प्रवेश परीक्षा सेवानिवृत्ती प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचार्यांची निवृत्तिवेतनाची प्रकरणे निवृत्तीच्या दिनांकाच्या २४ महिन्यांपूर्वी तयार करणे आदी बाबी या अभियानात समाविष्ट करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी खातेप्रमुखांना दिलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे.
कोट
प्रशासनात गतिमानता आणणे तसेच पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने स्वच्छ प्रशासन अभियान राबविले जाणार असून त्याअंतर्गत प्रशासकीय बाबतीतील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- अमोल येडगे,
मुख्य कार्यकारी अधिकारी