राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२३: आजचा दिवस शुभ फलदायी, धनवृद्धी व पदोन्नती संभवते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 07:28 AM2023-09-29T07:28:32+5:302023-09-29T07:28:55+5:30
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- चंद्र आज 29 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला ह्यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल व त्यामुळे चिंता वाढतील. आणखी वाचा
वृषभ- तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. आणखी वाचा
मिथुन- तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. स्नेहीजनां कडून भेटवस्तू मिळतील. आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा
कर्क- चंद्र आज 29 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. आणखी वाचा
सिंह-चंद्र आज 29 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. आणखी वाचा
कन्या- चंद्र आज 29 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
तूळ- चंद्र आज 29 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या येतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा
वृश्चिक- चंद्र आज 29 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल. आणखी वाचा
धनु-आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल. प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आणखी वाचा
मकर- आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल. आणखी वाचा
कुंभ- मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. आणखी वाचा
मीन- आनंद, उत्साह व प्रसन्न तन - मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. आणखी वाचा