आजचे राशीभविष्य: ६ राशींना तापदायक दिवस, सावध राहावे; आर्थिक व्यवहार जपून करावे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 07:29 AM2023-08-02T07:29:12+5:302023-08-02T07:29:59+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 02 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य: ६ राशींना तापदायक दिवस, सावध राहावे; आर्थिक व्यवहार जपून करावे

आजचे राशीभविष्य: ६ राशींना तापदायक दिवस, सावध राहावे; आर्थिक व्यवहार जपून करावे

googlenewsNext

मेष: आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार - विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार - विमर्श कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. लाभ संभवतो. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. कामाचा व्याप वाढल्याने अस्वस्थ राहाल. आणखी वाचा 

वृषभ: आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा 

मिथुन: संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृती बिघडेल. मानसिक दृष्टया निराश व्हाल. मनाला शांतता मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

कर्क: संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील. व्यापार्‍यांना विदेशी व्यापारात चांगला फायदा होईल. भागीदारी फायदेशीर ठरेल. आणखी वाचा 

सिंह: उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत. काळजी वाटणार्‍या बातम्या येतील. शत्रूला तोंड द्यावे लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा 

कन्या: आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद - विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. यशस्वी व्हाल. शेअर - सट्टापासून सावध राहा. आणखी वाचा 

तूळ: सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणे हितावह ठरेल. आणखी वाचा 

वृश्चिक: कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. तन - मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. मित्र, सगे सोयरे यांचे आपणाकडे येणे झाल्याने आपण आनंदी राहाल. गूढ विद्यांच्या अभ्यासात रस घ्याल. आणखी वाचा 

धनु: कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. दूरसंचार माध्यमातून दूरच्या ठिकाणी होणारा संपर्क लाभदायक ठरेल. आणखी वाचा 

मकर: आजच्या दिवसाची सुरवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा जपावे लागेल. आणखी वाचा 

कुंभ: आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल. आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमजापासून जपून राहावे. एखाद्याचे भले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होण्याची वेळ येईल. आणखी वाचा 

मीन: समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. लाभ होतील. मंगल कार्य आयोजित कराल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 02 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app