आजचे राशीभविष्य: थकबाकी मिळेल, धनसंचय होऊ शकेल; कार्यसफलतेचा आनंदी दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 06:56 AM2024-03-19T06:56:42+5:302024-03-19T07:00:32+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद-विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उद्भवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. आणखी वाचा
वृषभ: सुरुवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. धनसंचय होऊ शकेल. आणखी वाचा
मिथुन: आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आणखी वाचा
कर्क: आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपारनंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्यास, कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकेल. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा
सिंह: आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल. आरोग्यात सुधारणा होईल. खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. आणखी वाचा
कन्या: आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपारनंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
तूळ: आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते. लाभ होतील. मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. प्राप्तीत वाढ संभवते. आणखी वाचा
वृश्चिक: आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपारनंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात अनुकूलता लाभेल. आणखी वाचा
धनु: आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. प्रतिस्पर्धी व विरोधक ह्यांच्याशी वाद संभवतात. नवीन कार्यारंभात अडचणी निर्माण होतील. महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा
मकर: आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान-सन्मान संभवतात. दुपारनंतर मात्र तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. काही ना काही कारणाने संताप वाढेल व त्यामुळे कुटुंबीय व सहकारी ह्यांचे मन दुखावेल. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल. दुपारनंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकाल. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपारनंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणाने आपल्यातील रागीटपणा वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विरोधकांवर मात करू शकाल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. आणखी वाचा