मेष: वाद - विवादा पासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या - पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते. आणखी वाचा..
वृषभ: आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो. आणखी वाचा...
मिथुन: आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो. आणखी वाचा..
कर्क: आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. आणखी वाचा...
सिंह: आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. आणखी वाचा...
कन्या: आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. आणखी वाचा...
तूळ: टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा होणारा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील. आणखी वाचा...
वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. आणखी वाचा...
धनु: आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा...
मकर: आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. आणखी वाचा...
कुंभ: आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य - प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. आणखी वाचा...
मीन: आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. आणखी वाचा...