आज मोठा दिवस! उद्यापासून रात्र मोठी होऊ लागणार, असे का होते, हे आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 01:09 PM2023-06-26T13:09:14+5:302023-06-26T13:09:59+5:30
तुम्ही कधी नोटीस केलेय का की गेले काही दिवस... प्रकाश जास्त वेळ होता. जवळपास साडेसातपर्यंत... सकाळही लवकर व्हायची... कारण काय...
सध्या दिवस मोठा झाला आहे तर रात्र छोटी झाली आहे. परंतू, या खगोलशास्त्रीय घटनांचा आजचा शेवटचा मोठा दिवस असणार आहे. २६ जून म्हणजे आज २०२३ मधील सर्वात मोठा दिवस असणार आहे. २४ तासांच्या कालावधीत उजेडाचा कालावधी हा तब्बल १३ तास ४४ मिनिटांचा असणारआहे. तर रात्र १० तास १६ मिनिटांची असणार आहे.
प्रयागराजच्या आचार्य लक्ष्मीकांत शास्त्री यांनी सांगितले की, २७ जूनपासून रात्रीचा वेळ हळू हळू वाढणार आहे व दिवसाचा वेळ कमी होणार आहे. ही एक खगोलीय घटना आहे.
२१ जून ते २६ जून या काळात आपल्याला सर्वात मोठे दिवस दिसले आहेत. २७ जूनपासून एकेका मिनिटाने दिवस कमी होऊ लागणार आहे, तेवढ्याच मिनिटांनी रात्र वाढू लागणार आहे. अशाप्रकारे २३ सप्टेंबरला आणि २३ मार्चला १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असणार आहे. यानंतर पुन्हा दिवस मोठा, रात्र लहान असे चक्र सुरु असणार आहे.
२४ डिसेंबरला सर्वात मोठी रात्र असणार आहे. तिचा वेळ आजच्याच दिवसाएवढा म्हणजे १३ तास आणि ४४ मिनिटांचा असणार आहे. तर दिवस १० तास आणि १६ मिनिटांचा असेल.
असे का होते...
२१ जूनला सूर्य खूप उंचीवर असतो. यामुळे या दिवसांत रात्रीचा कालावधी कमी होतो. २१ सप्टेंबर येता येता, दिवस रात्र एकसमान होऊ लागतात. दुसरीकडे २१ सप्टेंबरपासून रात्र दिवसापेक्षा मोठी होऊ लागते. ही प्रक्रिया २३ डिसेंबरपर्यंत सुरु असते.