आजचे राशीभविष्य, १० सप्टेंबर २०२३ : घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील, आर्थिक लाभ होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 07:17 AM2023-09-10T07:17:31+5:302023-09-10T07:18:13+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope : 10 September 2023 : The atmosphere in the house will be peaceful, financial benefits will be there | आजचे राशीभविष्य, १० सप्टेंबर २०२३ : घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील, आर्थिक लाभ होतील

आजचे राशीभविष्य, १० सप्टेंबर २०२३ : घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील, आर्थिक लाभ होतील

googlenewsNext

मेष- आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आपल्या विचारात एकदम बदल होईल.  आणखी वाचा

वृषभ- आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल.  आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणे हितावह राहील. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल.  आणखी वाचा

सिंह- आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल.  आणखी वाचा

कन्या- आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. आणखी वाचा

तूळ- आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. आणखी वाचा

वृश्चिक- आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आपले बोलणे संयमित ठेवल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होऊ शकेल. पोटदुखीच्या विकाराने त्रस्त व्हाल. आणखी वाचा

धनु- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपार नंतर मात्र मनात नकारात्मक विचारांचे वादळ निर्माण होईल. आणखी वाचा

मकर- आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. दुपार नंतर स्वकीय व मित्र यांच्या सहवासात आनंदित होऊ शकाल. वाहनसौख्य मिळेल. आणखी वाचा

कुंभ- आज आपल्यात कले विषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होतील.  आणखी वाचा

मीन- आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील. अपचन व पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope : 10 September 2023 : The atmosphere in the house will be peaceful, financial benefits will be there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app