आजचे राशीभविष्य - २१ मार्च २०२४; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 07:49 AM2024-03-21T07:49:08+5:302024-03-21T07:56:53+5:30
Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज चंद्र 20 मार्च, 2024 बुधवारी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. आणखी वाचा
वृषभ - आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
मिथुन - आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आणखी वाचा
कर्क - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आणखी वाचा
सिंह - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ - मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल. आणखी वाचा
धनु - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. आणखी वाचा
कुंभ - आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. आणखी वाचा
मीन - आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आणखी वाचा