आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२३, केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल, कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-04-29 07:46:082023-04-29 07:48:25 | Updated: 2023-04-29 07:48:25

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष:  आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण व झोप ह्यात अनियमितता येईल.  आणखी वाचा 

वृषभ:  आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल.  आणखी वाचा 

मिथुन:  आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील.  आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. आणखी वाचा 

सिंह:  आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात.  आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल.  आणखी वाचा

तूळ:  आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. आणखी वाचा 

वृश्चिक: आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील.  आणखी वाचा 

धनु:  आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. आणखी वाचा  

मकर: आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा  

कुंभ: आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. नोकरी - व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल. आणखी वाचा 

मीन:  आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App