आजचे राशीभविष्य - २१ जून २०२२: धनु राशीला मनावर चिंतेचे ओझे अन् मिथुनसाठी लाभदायी दिवस!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:32 AM2022-06-21T07:32:52+5:302022-06-21T07:33:29+5:30
Today's horoscope - June 21, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...
मेष: आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. आणखी वाचा...
वृषभ: आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आणखी वाचा...
मिथुन: आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. आणखी वाचा...
कर्क: आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा...
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आणखी वाचा...
कन्या: आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...
तूळ: आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा...
वृश्चिक: आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर - सट्टा यात न पडणे हिताचे राहील. आणखी वाचा...
धनु: आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. आणखी वाचा...
मकर: आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा...
कुंभ: वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. आणखी वाचा...
मीन: आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...