मेष: आज मनाची एकाग्रता कमी झाल्याने मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. गुंवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. महत्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा...
वृषभ: आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे. मित्र व वडीलधार्यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा...
मिथुन: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. आणखी वाचा...
कर्क: आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपार नंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आणखी वाचा...
सिंह: आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. आणखी वाचा...
कन्या: आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान - सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा...
तूळ: आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. आणखी वाचा...
वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन व आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा...
धनु: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आईच्या तब्बेतीत बिघाड व घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थीक नुकसान व मानहानी संभवते. आणखी वाचा...
मकर: मित्रांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल. भावंडे व नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. दुपार नंतर एखाद्या दुर्घटनेमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. आणखी वाचा...
कुंभ: आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपार नंतर विचारात स्थैर्य येईल. आणखी वाचा...
मीन: आज आपल्या घरी एखादे मंगल कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. दुपार नंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल. आणखी वाचा...