आजचे राशीभविष्य, ३ सप्टेंबर २०२३: व्यापारात लाभ, जोडीदाराशी गोडवा पण वाद होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 08:12 AM2023-09-03T08:12:29+5:302023-09-03T08:12:48+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's Horoscope, September 3, 2023: Profit in business, sweetness with spouse but possibility of arguments | आजचे राशीभविष्य, ३ सप्टेंबर २०२३: व्यापारात लाभ, जोडीदाराशी गोडवा पण वाद होण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य, ३ सप्टेंबर २०२३: व्यापारात लाभ, जोडीदाराशी गोडवा पण वाद होण्याची शक्यता

googlenewsNext

मेष- आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल. आणखी वाचा

वृषभ- आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आणखी वाचा

कर्क- आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील.  आणखी वाचा

सिंह- आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

कन्या- आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान - सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.  आणखी वाचा

तूळ- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा

वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. आणखी वाचा

धनु- आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आईच्या तब्बेतीत बिघाड व घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर- आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल. आणखी वाचा

कुंभ- आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, September 3, 2023: Profit in business, sweetness with spouse but possibility of arguments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app