आजचे राशीभविष्य, ४ सप्टेंबर २०२३ : मेषसाठी आनंदाचा तर वृषभसाठी चिंतेचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:19 AM2023-09-04T07:19:02+5:302023-09-04T07:24:43+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, September 4, 2023: Joyous Day for Aries, Worrying Day for Taurus | आजचे राशीभविष्य, ४ सप्टेंबर २०२३ : मेषसाठी आनंदाचा तर वृषभसाठी चिंतेचा दिवस

आजचे राशीभविष्य, ४ सप्टेंबर २०२३ : मेषसाठी आनंदाचा तर वृषभसाठी चिंतेचा दिवस

googlenewsNext

मेष- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

वृषभ- आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्‍या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. आणखी वाचा

मिथुन- आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. आणखी वाचा

सिंह- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा

कन्या- आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

तूळ- आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल.  आणखी वाचा

वृश्चिक- आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल. शत्रूवर मात करू शकाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा

धनु- आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.  आणखी वाचा

मकर- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते. कोणत्याही कामात यश मिळणे अवघड होईल. आणखी वाचा

कुंभ- आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विशेषतः भावंडांशी संबंधात गोडी निर्माण होईल. आणखी वाचा

मीन- आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल. खाण्या पिण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, September 4, 2023: Joyous Day for Aries, Worrying Day for Taurus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app