आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२३ : आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल, प्रवासात अडचणी येतील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 07:10 AM2023-09-05T07:10:17+5:302023-09-05T07:15:01+5:30
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. आणखी वाचा
वृषभ- आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. आणखी वाचा
मिथुन- व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा
कर्क- आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. आणखी वाचा
सिंह- आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा
कन्या- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. आणखी वाचा
तूळ- आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. एखाद्या प्रवासामुळे काही आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा
वृश्चिक- आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा
धनु- आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील. आणखी वाचा
मकर- आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा. आणखी वाचा
कुंभ- आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपार नंतर मानसिक व्यग्रता वाढेल. आणखी वाचा
मीन- आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा