आजचे राशीभविष्य - ५ ऑक्टोबर २०२३, वडिल अन् शासनाकडून आज लाभ होऊ शकतो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 07:14 AM2023-10-05T07:14:35+5:302023-10-05T07:24:43+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. आणखी वाचा
वृषभ - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल. आणखी वाचा
मिथुन - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. आणखी वाचा
कर्क - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता. आणखी वाचा
कन्या - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
तूळ - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. आणखी वाचा
वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा
धनु - आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आणखी वाचा
मकर - गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल. आणखी वाचा
कुंभ - आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. आणखी वाचा