Asian Games 2018: भारताच्या नीना वरकिलला लांब उडीमध्ये रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:18 PM2018-08-27T19:18:38+5:302018-08-27T19:19:02+5:30
Asian Games 2018: महिला लांबउडीपटू नीना वरकिलने लांब उडीमध्ये भारताला रौप्यपदक जिंकवून दिले.
जकार्ता : भारतासाठी आजचा दिवस अॅथलेटीक्समध्ये दमदार असाच होता. कारण भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले, धावपटू सुधा सिंगने रौप्यपदकाची कमाई केली, त्यानंतर महिला लांबउडीपटू नीना वरकिलने भारताला रौप्यपदक जिंकवून दिले. नीनाने 6.52 मी. एवढी लांब उडी मारत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत चीनच्या बुई थी थाओने सुवर्णपदक पटकावले.
#AsianGames2018 : India's Neena Varakil wins a silver medal in women's long jump final. pic.twitter.com/igeqdzXMND
— ANI (@ANI) August 27, 2018
नीनाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले पदक आहे. यापूर्वी नीनाने 2017 साली भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर नीनाचे हे दुसरेच पदक आहे.