Asian Games 2018: स्टीपलचेसमध्ये सुधा सिंगला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 06:10 PM2018-08-27T18:10:12+5:302018-08-27T18:10:39+5:30
स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात सुधाने दमदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला.
जकार्ता : भारताची युवा धावपटू सुधा सिंगने देशाला आज रौप्यपदक पटकावून दिले. स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात सुधाने दमदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला. सुधाने 3000 मी. हे अंतर 9 मिनिटे 40 सेकंद एवढा वेळ घेतला, तिचे सुवर्णपदक यावेळी चार सेकंदांनी हुकले. कारण पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बेहरिनच्या यावी विनफ्रेडने हे अंतर 9.36 सेकंदांमध्ये पूर्ण केले.
#AsianGames2018: India's Sudha Singh wins silver in Women's 3000m Steeplechase. pic.twitter.com/jlnL328qir
— ANI (@ANI) August 27, 2018
सुधाने यापूर्वी 2010 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर थेट 2018 साली सुधाला आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावता आले आहे. सुधाने यापूर्वी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 2017 साली रौप्यपदक पटकावले होते.
#TeamIndia at the #AsianGames2018
— Team India (@ioaindia) August 27, 2018
In a brilliant effort #SudhaSingh wins Silver No. 12 for #TeamIndia in #Athletics Women's 3000m Steeplechase Finals clocking 9:40.03, to come in 2nd! #Chinta finished 11th with a timing of 10:26.21. #WellDone Sudha Singh 👏🇮🇳👟#IAmTeamIndiapic.twitter.com/LYR9wmTlQR