भारताचा धावपटू मोहम्मद अनासचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 06:52 PM2018-07-22T18:52:08+5:302018-07-22T18:52:58+5:30
भारताचा धावपटू मोहम्मद अनासने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
नवी दिल्ली : भारताचा धावपटू मोहम्मद अनासने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या अॅथलेटीक्स स्पर्धेमध्ये अनासने हा विक्रम केला आहे. या स्पर्धेच्या 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत त्याने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. या स्पर्धेत अनासने 400 मी. हे अंतर 45.24 सेकंदामध्ये पूर्ण केले आहे. या विक्रमाबद्दल भारतीय अॅथलेटीक्स महासंघाने अनासचे कौतुक केले आहे.
Congrats Mohd. ANAS @muhammedanasyah for breaking his own 400m #Indian record in #Czech Rep. New Record-45.24s,Previous Best-45.31s
— Athletics Federation of India (@afiindia) July 21, 2018
Congrats coach Galina Bukharina for success of #HimaDas & #Anas! #AsianGames2018@Ra_THORe@IndiaSports@Media_SAI@NeelamKapur@Adille1pic.twitter.com/wn5x0s3FpT
अनासने यापूर्वी 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. यापूर्वी अनासने हे अंतर 45.31 सेकंदांमध्ये पूर्ण केले होते. त्यानंतर सध्या झेल प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या स्पर्धेत अनासने जुना विक्रम मोडीत काढला.