मुंबई : महिंद्रा अॅण्ड महिंद्राने १७०० किलो मालवाहतूक क्षमतेची ‘महा-स्ट्राँग, महा बोलेरो’ ही चारचाकी बाजारात आणली आहे. एवढी प्रचंड वजन क्षमता असलेली ही या श्रेणीतील पहिलीच गाडी आहे.महिंद्रा कंपनीची ‘बोलेरो’ ही गाडी मालवाहतूकदारांची पहिली पसंती असते. यामध्येच आता कंपनीने बदल केले आहेत. याची क्षमता वाढविण्यात आली. या गाडीत सामान ठेवण्याची जागा ९ फूट लांब आहे. इतकी मोठी जागा या श्रेणीतील अन्य गाडीत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. मोठ्या जागेमुळेच गाडीची वजन क्षमता १७०० किलोपर्यंत वाढली आहे. याखेरीज डबल बोरिंग अॅक्सल, सक्षम श्रेणीतील ९-लीफ सस्पेन्शन आहे. ग्राहक त्यांच्या आवडीनुसार १३००, १५०० व १७०० किलो, या तीन श्रेणीत ही गाडी खरेदी करु शकतील.कंपनीच्या आटोमोटीव्ह (विक्री व विपणन) विभागाचे प्रमुख विजय नाकरा यांनी सांगितले की, कंपनीने २० वर्षांच्या अनुभवातून ग्राहकांना सर्वोत्तम दर्जा देण्यासाठी ही गाडी तयार केली आहे. या गाडीच्या निमित्ताने महिंद्राने विशेष योजनासुद्धा आणली आहे. त्याअंतर्गत कंपनी २ वर्षे गाडीची मोफत देखभाल करेल. चार वर्षांनी ४ लाख रुपयांची ‘बायबॅक’ हमीसुद्धा कंपनी देत आहे.
१७०० किलो क्षमतेची ‘महा-स्ट्राँग, महा बोलेरो’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 5:12 AM