Apache RTR 200 4V: टीव्हीएसची धांसू बाईक लाँच; ड्रायव्हिंगचे तीन मोड्स, जाणून घ्या किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 12:20 PM2021-12-01T12:20:52+5:302021-12-01T12:21:06+5:30

Apache RTR 200 4V: टीव्हीएस मोटर कंपनीने मंगळवारी आपली नवीन 2022 Apache RTR 200 4V लाँच केली आहे. कंपनीने नवीन बाईक तीन रंगांमध्ये आणली आहे.

2022 TVS Apache RTR 200 4V Launch Price Rs 1.34 Lakhs; new LED DRL, headlamp, see features | Apache RTR 200 4V: टीव्हीएसची धांसू बाईक लाँच; ड्रायव्हिंगचे तीन मोड्स, जाणून घ्या किंमत 

Apache RTR 200 4V: टीव्हीएसची धांसू बाईक लाँच; ड्रायव्हिंगचे तीन मोड्स, जाणून घ्या किंमत 

googlenewsNext

टीव्हीएस मोटर कंपनीने मंगळवारी आपली नवीन 2022 Apache RTR 200 4V लाँच केली आहे. कंपनीने नवीन बाईक तीन रंगांमध्ये आणली आहे. यामध्ये ग्लॉसी ब्लॅक, पर्ल व्हाईट आणि मॅट ब्ल्यू रंग आहे. कंपनीने या बाईकमध्ये नवीन हेडलँप्स दिलेले आहेत, तसेच सिग्नेचर डीआरएल देखील दिली आहे. 

नव्या 2022 Apache RTR 200 4V ची ड्युअल चॅनल एबीएस मॉडेलची एक्स शोरुम किंमत 1,38,890 रुपये ठेवण्यात आली आहे. तर सिंगल चॅनल एबीएस सिस्टिमची एक्स शोरुम किंमत 1,33,890 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. बाईक आताही तीन रायडिंग मोड स्पोर्ट, अर्बन आणि रेन मोडमध्ये येते. ही या सेगमेंटची एकमेव बाईक आहे जी तीन मोड्समध्ये येते. 

दुसरी महत्वाची बाब म्हणजे नवीन मॉडेलमध्ये प्रिलोड अॅडजस्टेबल शोवा फ्रंट सस्पेन्शन,  TVS SmartXonnect ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, शोवा रिअर मोनोशॉक आणि अॅडजेस्टेबल ब्रेक्स आणि क्लच लिव्हर मिळतो. 

बाईकमध्ये 197.75 सीसीचे सिंगल सिलिंडर 4 व्हॉल्व्ह ऑईल कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससोबत येते. जे 8500 आरपीएमवर 20.2 बीएचपीची ताकद आणि 7500 आरपीएमवर 16.8 एनएमचा पीक टॉर्क देते. 

Bajaj New Electric Scooter: बजाजची आणखी एक इलेक्ट्रीक स्कूटर येतेय; Ola S1, TVS iQube ला देणार टक्कर

काही दिवसांपूर्वीच बजाजच्या मालकांनी ओला सारख्या कंपन्यांना खाऊन टाकणार असे वक्तव्य केले होते. त्यानंतर लगेचच आता बजाज ऑटो नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांत ही स्कूटर भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.  सध्या भारतीय रस्त्यांवर बजाजची चेतक(Bajaj Chetak Electric), टीव्हीएस आयक्यूब  (TVS iQube), एथर 450एक्स (Ather 450X) या स्कूटर धावत आहेत. तर ओला एस १ (Ola S1 And Ola S1 Pro)  आणि सिंपल वन (Simple One) च्या स्कूटर रस्त्यावर अद्याप यायच्या आहेत. अन्य काही स्टार्टअप कंपन्यांच्या स्कूटर रस्त्यावर धावत आहेत. 

Web Title: 2022 TVS Apache RTR 200 4V Launch Price Rs 1.34 Lakhs; new LED DRL, headlamp, see features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.