तब्बल 34 वर्षांनंतर अपहरणासाठी प्रसिद्ध कार होणार बंद...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 11:43 AM2018-10-28T11:43:55+5:302018-10-28T11:44:49+5:30
मारुती 800 नंतर कंपनीची ही दुसरी कार होती. मागील 36 वर्षांपासून ही कार विकली जात होती.
मारुती सुझुकीने आपली सर्वाधिक खपलेली ओम्नीची निर्मिती बंद करण्याचे ठरविले आहे. मारुती 800 नंतर कंपनीची ही दुसरी कार होती. मागील 34 वर्षांपासून ही कार विकली जात होती.
मारुतीने भारतात पहिली कार मारुती 800 लाँच केल्यानंतर 1984 मध्ये ओम्नी ही कार लाँच केली होती. या कारला तेव्हा मारुती व्हॅन म्हणून ओळखले जात होते. ही व्हॅन बहुउपयोगी असल्याने भारतीयांनी तिला चांगला प्रतिसाद दिला होता. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये ही कार तर फारच गाजली होती. गुन्हेगारी, अपहरणसारख्या चित्रपटातील प्रसंगांसाठी ही कार मोठया प्रमाणावर वापरली जात असल्याने व्हॅन चांगलीच मनात बसली होती.
खरे म्हणजे आजही महिन्याला 7 हजार ओम्नींची विक्री होते. मात्र, मारुतीने या कारचे उत्पादन बंद करण्याच निर्णय घेतला आहे. याला कारण आहे भारत सरकारने नव्याने लागू केलेले सुरक्षा नियम. कारण ही कार या नव्या नियमांमध्ये बसत नाही. कंपनीने पहिल्यांदा उतरविलेल्या कारचे इंजिन 800 सीसी होते. यानंतर कारमध्ये मोठे बदलही करण्यात आले होते. मात्र, मूळ डिझाईनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.
या ओम्नी कारला लवकरच बंद करण्यात येणार असून तिची जागा वॅगनआर ही 7 सीटर कार घेणार आहे. ही कार नवीन स्विफ्ट आणि डिझायरच्या प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. शिवाय मारुतीची इकोही या कारची जागा घेणार आहे. इको कारमध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन आहे.