महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV XUV400 ची पहिली झलक, आनंद महिंद्रांकडून व्हिडिओ ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 11:05 AM2022-09-01T11:05:57+5:302022-09-01T11:08:06+5:30

Mahindra XUV400 EV : महिंद्रा कंपनी 8 सप्टेंबर 2022 रोजी ही बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे.

anand mahindra reveals mahindra xuv400 ev first look on ganesh chaturthi 2022 | महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV XUV400 ची पहिली झलक, आनंद महिंद्रांकडून व्हिडिओ ट्विट

महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV XUV400 ची पहिली झलक, आनंद महिंद्रांकडून व्हिडिओ ट्विट

Next

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra & Mahindra) इलेक्ट्रिक SUV XUV400 चा फर्स्ट लूक समोर आला आहे. महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ट्विट करून महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV XUV400 ची पहिली झलक दाखविली आहे. 

महिंद्रा कंपनी 8 सप्टेंबर 2022 रोजी ही बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, आजचा दिवस खूप शुभ आहे, त्यामुळे या निमित्ताने आम्ही लवकरच तुमच्यासमोर कारवरील पडदा उचलणार आहोत. व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, महिंद्राची इलेक्ट्रिक SUV XUV400 कार 8 सप्टेंबर रोजी लाँच होईल.

याआधी महिंद्राने यूकेमध्ये आपल्या आगामी इलेक्ट्रिक SUV ला प्रोमोट करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामध्ये XUV 800, XUV 900 चा समावेश आहे. XUV 400 च्या टेस्ट ड्राइव्ह अंतर्गत असल्याचे म्हटले जाते. महिंद्रा मोठ्या उत्साहात इलेक्ट्रिक व्हीकल सेंगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे.  सध्या टाटा मोटर्स आपल्या टाटा नेक्सॉन आणि टाटा नेक्सॉन मॅक्ससह इलेक्ट्रिक पीव्ही सेगमेंटमध्ये सर्वात पुढे आहे. आता महिंद्रा सुद्धा आपली इलेक्ट्रिक SUV XUV400 बाजारात आणणार आहे.

मिळू शकतात ADAS फीचर्स
या इलेक्ट्रिक कारच्या मोटर किंवा बॅटरीबद्दल सध्या फारशी माहिती नाही. कंपनी याला सिंगल फ्रंट-व्हील-ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटरसह आणू शकते, जी सुमारे 150hp पॉवर जनरेट करू शकते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनी XUV400 ला ADAS फीचर्ससह सुसज्ज करू शकते. या कारची थेट स्पर्धा Tata Nexon EV शी होऊ शकते, जी सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे.

Web Title: anand mahindra reveals mahindra xuv400 ev first look on ganesh chaturthi 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.