रात्री व दिवसा मागील वाहनाच्या प्रखर प्रकाशापासून बचाव करणारा अॅन्टी ग्लेअर आरसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:46 PM2017-10-06T23:46:04+5:302017-10-06T23:46:31+5:30

कारमधील आतील बाजूला असलेल्या सेंट्रल मिररचा फायदा रात्री व्हायला हवा, ड्रायव्हरला मागील वाहनाच्या प्रकाशजोताच्या त्रास होता कामा नये. त्यासाठी अॅन्टी ग्लेअर आरसा हा एक चांगला उपाय आहे.

Antar mirror mirror in night and daylight | रात्री व दिवसा मागील वाहनाच्या प्रखर प्रकाशापासून बचाव करणारा अॅन्टी ग्लेअर आरसा

रात्री व दिवसा मागील वाहनाच्या प्रखर प्रकाशापासून बचाव करणारा अॅन्टी ग्लेअर आरसा

Next

रात्रीच्यावेळी कार चालवताना मागून येणाऱ्या वाहनांचे प्रखर प्रकाशझोत कारमधील विंडशिल्डला मध्यभागी लावलेल्या आरशातून ड्रायव्हरच्या डोळ्यावर थेट येत असतात. अशा वेळी अनेकदा ड्रायव्हरचे लक्ष विचलीत होते, त्याला त्यामुळे समोरून येणारे वाहनही नीट दिसू शकत नाही. याचे कारण त्याचे डेळे मागील वाहनाच्या प्रकाशझोतामुळे दिपून जातात. सर्वसाधारण आरशांमधून हा परावर्तीत होणारा प्रकाश खूप त्रासदायक असतो. वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूला बाहेरून असणाऱ्या आरशातूनही अशा प्रकारच्या प्रकाश परावर्तनाचा त्रास ड्रायव्रना सहन करावा लागतो. आरशाचा कारसाठी वापर सुरू झाल्यानंतर विविध प्रकारचे संशोधनही त्या त्या अनुभवांनुसार केले गेले. त्यातून अॅन्टी ग्लेअर काचेचा शोध लागला व त्या अनुषंगाने आरसा तयार करण्यात आला . यात आज हातानेच अॅडजेस्ट केल्यानंतर तुम्हाला सेंट्रल मिरर म्हणजे कारमधील आतील बाजूस मध्यावर असणारा आरसा हा अशा प्रकारचा विकत मिळतो. काही उच्च श्रेणीमधील कारना तो कंपनीकडूनच पुरवला जातो. मात्र ज्या कारना तो नसतो,त्या कारच्या ड्रायव्हर्सना रात्रीच्यावेळी कार चालवताना मागून येत असलेल्या वाहनाच्या हेडलॅम्पचा प्रकाशझोत चुकवण्यासाठी नाना खटपटी कराव्या लागतात.अगदी क्षणाक्षणाला त्या आरशामुळे होणारा त्रास चुकवावा लागतो. यासाठी अँन्टी ग्लेअर आरसा बसवून घेता येतो. मॅन्युअल प्रमाणेच अन्य आपोआप अॅडजेस्ट होणारा व मागील लाईटला मंद करणारा आरसाही मिळतो. आधुनिक कार्समध्ये हा सेन्सर्सद्वारे मागील वाहनाचा प्रकाशझोत मंद करणारा आरसा काहीसा महाग असतो. तर हातानेच त्या आरशाला वर खाली करून त्याचा अॅन्टी ग्लेअरचा फायदा करून देणाराही साधा आरसा मिळतो. त्यामुळे मागील वाहनाच्या प्रकाशझोताचा त्रास तुमच्या डोळ्यांना होत नाही व त्यामुळे तुमचे डोळे त्यामुळे दिपून जात नाहीत. सकाळच्यावेळेत तोच आरसा पुन्हा वर करून सर्वसाधारण आरशांप्रमाणे वापरता येतो.
नेहमीच्या आरशाच्या आकाराचाच हा आरसा मिळतो. तो थेट विंडशिल्डवर आतील बाजूने चिकटवून लावण्याचाही मिळतो, तसेच असलेल्या आरशावर वरच्या बाजूने अडकवण्याच्या पद्धतीचाही मिळतो. मात्र आधीच्या आरशाला वरच्या बाजूने अडकवण्याचा आरसा मूळ आरशाला जड होत असल्याने तो मूळ आरशाच्या हूकला व त्याच्या वळण्याच्या क्रियेसाठी असलेल्या बॉलला सैल करतो, कार चालवताना तो अॅडजेस्ट केला असला तरी तो खाली येतो व मागील काहीच दृश्य तुम्ही पाहू शकत नाही. त्याचे वजन हे मागील आरशावर पेललेले असल्याने तो वापरणे अधिक त्रासदायक ठरतो. त्यापेक्षा मूळ आरसा काढून अॅन्टीग्लेअर आरसा नव्याने बसवून घेणे कधीही चांगले असते. रात्रीच्यावेळी वाहन चालवताना मागून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश कमी करणारा हा मॅन्युएली ऑपरेटेड आरसाच मात्र स्वस्त व जास्त कटकटीचा नसल्याने रात्रीच्या वाहनचालनात खूप उपयुक्त ठरावा असा आहे.

Web Title: Antar mirror mirror in night and daylight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार