Royal Enfield च्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दीर्घकालावधीपासून चाहते ज्या बाईकची वाट पाहत होते, अखेर त्या बाईकच्या लाँचची घोषणा कंपनीनं केली आहे. १ सप्टेंबर रोजी कंपनी आपली Royal Enfield Classic 350 लाँच करणार आहे. कंपनीनं या बाईकच्या लाँचपूर्वी एक टीझरही जारी केला आहे.
केवळ ११ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये बाईकची थोडीशी झलक दिसून येत आहे. ज्यामध्ये सुरुवातीला हँडलबार आणि हेडलॅम्प दाखवण्यात आले आहेत. अलीकडेच, अशी बातमी आली होती की देशातील काही डीलरशिपवर या बाईकची अनधिकृत बुकिंगही सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, कंपनी क्लासिक 350 च्या या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवर काम करत आहे आणि अनेक प्रसंगी चाचणी दरम्यान ती बाईक स्पॉटही करण्यात आली आहे.
स्पॉट करण्यात आलेल्या स्पाय फोटोंमध्ये पाहिलं तर यामध्ये क्रोम बेझलसोबत रेट्रो स्टाईलच्या सर्क्युलर हेडलँप, क्रोम प्लेटेड एक्झॉस्ट (सायलेन्सर), राऊंड शेप मिरर. टियर ड्रॉप शेपमध्ये फ्युअल टँक आणि आकर्षक फेंडर्स देण्यात आले आहेत. याच्या साईड पॅनल आणि फ्युअल टँकवरही ग्राफीक्स देण्यात आले आहेत. तसंच फेंडरमध्ये नव्या स्ट्रीप्सही दिसून आल्या आहेत.
काय आहे विशेष?नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक सिंगल आणि ड्युअल सीट व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. नवीन सीट सेटअपमध्ये मागील सीटच्या काठावर अधिक चांगल्या कुशनसह अधिक गोलाकार फिनिश देण्यात आलं आहे, जे लांब पल्ल्यापर्यंत आरामदायक राइडचा अनुभव प्रदान करेल. नेक्स्ट जनरेशन बाईकची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी चालवताना त्याचं कंपनी खुप कमी जाणवेल. असं सांगितलं जात की या बाईकमधील कंपन कमी करण्यासाठी बॅलेंन्सर शाफ्ट जोडण्यात आला आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला होतो. नवीन बाईक सध्याच्या मॉडेलपेक्षा किंचित महाग असू शकते.