नवी दिल्ली : देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) कंपनी आता भारतीय मार्केटमध्ये जवळपास 14 वर्षांनंतर आपली लोकप्रिय स्कूटर बजाज चेतक (Bajaj Chetak) नव्या इलेक्ट्रिक अवतारामध्ये आणणार आहे. यासाठी लाँचिंगचा मुहूर्त ठरला असून पुन्हा एकदा 'हमाssरा बजाज'चा आवाज ऑटो मार्केटमध्ये घुमणार आहे. येत्या 14 जानेवारीला बजाज चेतक लाँच करण्यात येणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, लवकरच बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरु केली जाऊ शकते. ही स्कूटर ईको आणि स्पोर्ट या दोन रायडिंग मोडमध्ये असून सुरुवातीला पुणे आणि त्यानंतर बंगळुरुमध्ये लाँच करण्यात येणार आहे. या स्कूटरमध्ये 4kWची इलेक्ट्रिक मोटर असणार आहे, ज्यामध्ये आयपी 76 रेटेड लीथियम बॅटरी दिली आहे. स्कूटरची किंमत 1.1 लाख रुपयांपासून 1.2 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम, दिल्ली) असू शकते.
इको मोडमध्ये स्कूटर 95 किमीपर्यंत चालवली जाऊ शकते. तर स्पोर्ट मोडमध्ये स्कूटर 85 किमीपर्यंत चालवली जाऊ शकते. इतर इलेक्ट्रिक टू-व्हिलर मॅन्युफॅक्चर्सप्रमाणे बजाजकडून स्कूटरसोबत पोर्टेबल किंवा स्वॅपेबल बॅटरी पॅक दिला जाणार नाही. म्हणजे, बॅटरी स्कूटरमध्ये फिक्स असणार आहे. दरम्यान, बाकीच्या टू-व्हिलर कंपन्यांकडून इतर बजाज इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंटेलिजेंट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (IBMS) दिली जाईल, जे बॅटरीची चार्जिंग आणि डिस्चार्जिंगला कंट्रोल करेल.
स्कूटरमध्ये रिव्हर्स असिस्ट मोडसोबत रिजनेरेटिव्ह ब्रेकिंग फीचर दिले जाणार आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग फीचर ब्रेकपासून तयार होणाऱ्या उष्णतेला कायनेटिक एनर्जीमध्ये रुपांतर करेल. त्यामुळे स्कूटरला एक्स्ट्रा एनर्जी मिळेल आणि स्कूटर जास्त लांबपर्यंत चालवली जाऊ शकते. याशिवाय, चेतक इलेक्ट्रिक अॅपच्या माध्यमातून स्कूटर स्मार्टफोनला कनेक्ट करता येऊ शकते.
दरम्यान, बजाज कंपनीने 1972 मध्ये पहिल्यांदा लाँच केलेल्या स्कूटरची निर्मिती 2006 मध्ये बंद केली होती. ज्यावेळी बजाज चेतकला मार्केटमध्ये लाँच केले, त्यावेळी याला ‘हमारा बजाज’ असे स्लोगन देण्यात आले होते. तसेच महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव चेतक होते, यावरून कंपनीने या स्कूटरचे नाव चेतक ठेवले होते. या स्कूटरमध्ये 145 सीसी 2 स्ट्रोक इंजिन होते.
आणखी बातम्या....डिसेंबर महिन्यात देशभरात सर्वच दुचाकींच्या विक्रीमध्ये झाली मोठी घटभारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणारटाटा मोटर्सने धडा घेतला; Harrier मध्ये नवीन फिचर्स देणार